महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची घेतली भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. राज ठाकरे आज ठाण्यात आले होते. त्यांनी ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात उपचार घेत असलेल्या पिंपळे आणि सुरक्षा रक्षकाची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी लवकर बरे व्हा असं पिंपळे यांना सांगितलं. यावेळी राज ठाकरे यांनी पोलीसांशीही चर्चा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading