ठाणे शहर काँग्रेसतर्फे महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा

ठाणे शहर काँग्रेसतर्फे महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज एक मूक मोर्चा काढण्यात आला होता. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले असताना गंभीर हल्ला झाला होता. यामध्ये पिंपळे यांची दोन बोटं तर सुरक्षा रक्षकाचं एक बोट तुटलं होतं. या हल्ल्याच्या सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून प्रत्येक जण याचा निषेध करत आहे. आज काँग्रेसतर्फे एक मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. आंदोलन कर्त्यांच्या हातात भ्याड हल्ल्याचा निषेध असो असे फलक होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading