महाराष्ट्रात महायुतीला ४५ हून अधिक जागांवर ५१ टक्के मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची

लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय-२०२४ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात महायुतीला ४५ हून अधिक जागांवर ५१ टक्के मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची असेल, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून स्वप्नातील भारत घडविण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते महायुतीमध्ये एकदिलाने कार्य करतील, असे बावनकुळे यांनी नमूद केले. भाजपाच्या महाविजय-२०२४ मध्ये ठाणे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ठाणे शहराचा झंझावाती दौरा करण्यात आला. या दौऱ्यात त्यांनी गडकरी रंगायतनमध्ये भाजपाच्या एक हजार `सुपर वॉरियर्स’बरोबर संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी लोकसभा निवडणूकप्रमुख विनय सहस्रबुद्धे, आमदार गणेश नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आदी उपस्थित होते.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading