विनातिकीट प्रवासाच्या एकूण ४,४३८ प्रकरणांतून एका दिवसात १६.८५ लाख रु. दंड

कल्याण रेल्वे स्थानकावर सखोल तिकीट तपासणीचा परिणाम म्हणून विनातिकीट प्रवासाच्या एकूण ४,४३८ प्रकरणांतून एका दिवसात १६.८५ लाख रु. दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वे मुंबई विभागाचे १६७ तिकीट तपासणी कर्मचारी आणि दोन अधिकारी अरुण कुमार, आणि डग्लस मिनेझिस ३५ आरपीएफ कर्मचारी कल्याण रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासणी मोहिमेत होते. सर्व बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मुंबई विभाग विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरी, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचे करण्यात येते.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading