महापौर चषक फूटबॉल स्पर्धेचं उद्घाटन

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक फूटबॉल स्पर्धेचं उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झालं. ठाणे जिल्हा फूटबॉल विफा अडॉक कमिटी यांच्या सहकार्यानं गावंड बाग येथील मैदानात पहिली महापौर चषक फूटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गावंड बाग येथील फूटबॉल टर्फमध्ये महापालिकेच्या इतिहासात प्रथमच फूटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात ठाणे पोलीस विरूध्द मुंब्रा फूटबॉल क्लब यांच्यात रंगलेल्या सामन्यात ठाणे पोलीस क्लब विजयी झाला. पहिल्या दिवशीचा अंतिम सामना डोंबिवली फूटबॉल क्लब विरूध्द यंग गेम्स यांच्यात रंगला. उद्या या स्पर्धेचं पारितोषिक वितरण होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading