महापुरषांच्या नावाचा उल्लेख प्रथम करावा ठाण्यातील एक सामाजीक कार्यकर्ते राजीव दत्ता यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महापुरषांच्या नावाचा उल्लेख प्रथम करावा अशी मागणी ठाण्यातील एक सामाजीक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात संर्दभात राजीव दत्ता यांनी काही पत्र व्यवहार केला होता. त्याला महापालिकेकडुन मिळालेल्या उत्तरात राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालय असा लेटरहेडवर उल्लेख होता. प्रत्येकक्षात मात्र शिवाजी महाराजांच नाव हे प्रथम असलं पाहीजे अस राजीव दत्ता यांच म्हणणं आहे. महापुरषांच्या नावाचा उल्लेख हा प्रथम असला पाहिजे आणि मग इतर नावांचा उल्लेख असावा अशी अपेक्षा व्यक्त करुन कायदेशीर उपाय योजना करावी अशी विनंती राजीव दत्ता यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व सबंधीतांना केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading