महापालिकेने मागविले 1 लाख कोवीड 19 रॅपिड ॲन्टीजन किटस्

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात चाचण्या होण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 1 लाख कोवीड रॅपिड ॲन्टीजन किटस् मागविण्यात आले असून दोन दिवसांत ते किटस् प्राप्त होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली. कोवीडच्या चाचण्या वाढविणे संदर्भात पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने तातडीने हे किटस मागविण्यात आले आहेत. कोवीड 19 विषाणूची लक्षणे आढळणाऱ्या संशयित रूग्णाची तसेच बाधित रूग्णांचे स्वॅब घेवून केवळ 30 मिनीटांमध्ये तात्काळ चाचणी अहवाल या रॅपिड ॲन्टीजन किटसच्या माध्यमातून शक्य होणार आहे. यामुळे चाचण्यांची संख्याही वाढणार असून कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडून तसेच शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीमध्ये हे किटस खरेदी करण्यात येणार आहेत. या किटसच्या माध्यमातून स्वॅब घेण्यासाठी लॅबची गरज भासणार नसून ज्या ठिकाणी हॅाटस्पॅाटस् जाहिर केले आहेत त्या ठिकाणी किंवा प्रतिबंधित क्षेत्रातही या किटसच्या माध्यमातून स्वॅब टेस्टींग करता येवू शकणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading