कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द

गेले 30 वर्षे अखंडितपणे सुरू असलेली आणि देशभरातील खेळाडूंचे आकर्षण ठरलेली ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करावी लागत असल्याची घोषणा महापौरांनी आज केली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही देशभरात नावलौकिक प्राप्त झालेली मॅरेथॉन असून आजपर्यत अनेक नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेला आपली हजेरी लावलेली आहे. दरवर्षी 25 ते 30 हजार स्पर्धक यात सहभागी होत असतात. दरवर्षी पावसाळ्यात होणारी ही मॅरेथॉन खेळाडूंचे खास आकर्षण तर असतेच शिवाय ठाणे शहरातील अनेक सामाजिक घटक, विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, क्रीडाप्रेमी, सिनेकलावंत या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने अनेक गोष्टींना मर्यादा आल्या आहेत त्यामुळे यंदा ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन घेणे शक्य नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. दरवर्षी सुमारे 30 हजारांहून अधिक स्पर्धेक हे राज्यातून ठाण्यात दाखल होत असतात, परंतु यंदा त्यांना स्पर्धेपर्यंत पोहचणे शक्य नाही, तसेच स्पर्धेच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग राखणे देखील शक्य नाही. एकूणच सध्याची परिस्थिती पाहता 31 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करण्यात आली असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading