महापालिकेनं केला ५०० कोटींचा मालमत्ता वसुलीचा टप्पा पार

मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झाला आहे. गेल्यावर्षी या कालावधीपर्यंत ३५० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसुल झाला होता. गेल्यावर्षाच्या तुलनेत २०२२-२३ या आर्थिक वर्षात १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कराची वसुली झाली आहे. असे असले तरी काही करदात्यांनी अद्यापपर्यंत कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पध्दतीने मालमत्ता धारकांकडे पोहचविण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही अशा करदात्यांनी कर वसुलीच्या कारवाईअंतर्गतची अप्रिय घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून विनाविलंब कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

प्रभागसमिती निहाय झालेली वसुली
उथळसर– ३४.४३ कोटी
नौपाडा कोपरी – ६३.१४ कोटी
कळवा- १६.९४ कोटी
मुंब्रा – १९.०५ कोटी
दिवा- १९.०३ कोटी
वागळे इस्टेट- १६.५५ कोटी
लोकमान्य सावरकर – १९.१० कोटी
वर्तकनगर – ७७.४६ कोटी
माजिवडा मानपाडा – १७३.९८ कोटी
ठाणे महापालिका मुख्यालय – ६२.४३ कोटी

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading