महापालिकेतील अधिकारी-कर्मचा-यांची वेतन खाती शासकीय बँकांमध्ये वळवण्याचे महापौरांचे आदेश

ठाणे महापालिका अधिकारी-कर्मचा-यांची वेतन खाती तसंच विविध योजनांची खाजगी बँकांतील खाती शासकीय बँकांमध्ये वळवण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला आहे. महापालिकेच्या विविध योजनांची खाती ॲक्सीस बँकेमध्ये आहेत. सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ॲक्सीस बँकेत उच्च पदावर आहेत. त्यामुळं ही खाती वळवण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेनं एकप्रकारे फडणवीस यांना धक्का दिला आहे. काल महापालिका-अधिकारी कर्मचा-यांची वेतन खाती शासकीय बँकांमध्ये वळवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला. महापौरांनी तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत. खाजगी बँका बुडाल्या तर महापालिकेचं नुकसान होऊ शकते त्यामुळं महापालिकेची खाजगी बँकेतील खाती शासकीय बँकेत वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading