महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जितेंद्र आव्हाड समर्थकांकडुन मारहाण

ठाण्यामध्ये सध्या गाजत असलेला आमदार जितेंद्र आव्हाड आणि साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना संपवण्याचा कट रचण्याबाबतचं रेकॉर्डींग व्हायरल झाल्यानंतर त्याच्या संतंप्त प्रतिक्रिया उमटल्या. आव्हाड यांच्या समर्थकांनी पालिकेच्या प्रवेश द्वारातचं आहेर यांना चोप दिला. यामध्ये आहेर जखमी झाले होते. त्यांच्यावरील प्राथमीक उपचारा नंतर त्यांना ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यरात आलं. पोलिसांनी या प्रकरणी आव्हाडांसह सात जणां विरोधात गुन्हे दाखल केले असुन चार जणांची न्यायालयानं जामिनावर मुक्तता केली आहे. मुख्यमंत्री अणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रात्री उशीरा ज्युपीटर हॉस्पीटल मध्ये जाऊन महेश आहेर यांची विचारपुस केली. हा वाद म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्र्यांमधीलं सुप्तसंर्घषाचा बळी असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading