हसीबा शेख या ठाणे महापालिकेच्या कौसा येथील शाळेतल्या दहावीच्या विद्यार्थिनीने ९७ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. यापूर्वी हसीबा आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत पहिली आली होती. तसेच ठाणे महापालिका आयोजित बाळासाहेब ठाकरे चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला होता. आता दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्यानं तिचे सर्वत्र तौकुत होत आहे.