महापालिकेची चौथ्या दिवशीही अतिक्रमणावरील कारवाई सुरूच

ठाणे महापालिकेनं अतिक्रमण मुक्त पदपथ करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेअंतर्गत चौथ्या दिवशी १२७ हातगाड्या, ७२ टप-या आणि २४१ पदपथांवरील बांधकामं निष्कासित करण्यात आली. शहराच्या विविध भागात महापालिकेनं सुरू केलेली अतिक्रमण कारवाई चौथ्या दिवशीही जोरात सुरू आहे. या कारवाईअंतर्गत वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ३७ हातगाड्या, २० पदपथांवरील अतिक्रमणं, दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात १२ हातगाड्या, १९ पदपथांवरील अतिक्रमणं, ४ टप-या, माजिवडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ३ पदपथांवरील अतिक्रमणं, १७ हातगाड्या, १७ फेरीवाले, वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये १७ पदपथांवरील अतिक्रमणं, ८ हातगाड्या, २८ टप-या, २९ फेरीवाले, नौपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये २८ पदपथांवरील अतिक्रमणं, ७ हातगाड्या, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये ११ पदपथांवरील अतिक्रमणं, १२ हातगाड्या, कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये १८ पदपथांवरील अतिक्रमणं, १२ हातगाड्या, ५ टप-या, उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये ६ हातगाड्या, ७२ पदपथांवरील अतिक्रमणं, ८ टप-या तर मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये २३ हातगाड्या, १० लाकडी बाकडी, ६ लोखंडी स्टँड, ५ टप-या आणि ३२ दुकानांसमोरील शेड निष्कासित करण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading