महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरुच

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून काल ७ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली तर एकाच्या विरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील दिवा पश्चिम नागवाडी येथिल दत्ता काशिनाथ पाटील यांचे पहिल्या मजल्यावरील आरसीसी कॉलम आणि स्लॅब तोडण्यात आले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती २, नौपाडा प्रभाग समिती २, वर्तकनगर प्रभाग समितीमधील येऊर येथे १ आणि कळवा प्रभाग समितीमधील १ वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी राजेश मोहिते यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading