पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे निदर्शनं

पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत जवळपास रोज वाढ होत आहे. यामुळं पेट्रोल, डिझेलचे दर १००च्या घरात गेले आहेत. सततच्या या दरवाढीमुळे महागाई वाढली असून सर्वसामान्य माणसाला जीवन मुश्कील झालं आहे. एकीकडे कोरोनामुळे नोक-यांवर गदा आली असतानाच दुसरीकडे या दरवाढीमुळे सर्वसामान्य मनुष्य कोलमडून गेला आहे. या निषेधार्थ महिला आघाडीतर्फे ही निदर्शनं करण्यात आली. चलेजाव चलेजाव मोदी सरकार चलेजाव, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करून देशातील जनतेला महागाईच्या आगडोंबात होरपळणा-या मोदी सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो, हाय हाय हाय हाय मोदी सरकार हाय हाय, महागाई कमी झालीच पाहिजे अशा घोषणाही यावेळी देण्यात येत होत्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading