महापालिका शाळेतील विद्यार्थींनींसाठी नुकतीच ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

महापालिका शाळेतील विद्यार्थींनींसाठी नुकतीच ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड, ठाणे महापालिकेचा शिक्षण विभाग आणि मीमांसा या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शाळा क्रमांक २३ मध्ये झालेल्या या कार्यशाळेत, इयत्ता पाचवी ते नववीच्या २१८ विद्यार्थीनी सहभागी झाल्या. महिलांमध्ये जागरुकतेसाठी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याच अंतर्गत विद्यार्थीनींना मार्गदर्शन करण्यासाठी ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे संदीप माळवी यांनी सांगितले. या कार्यशाळेत, विद्यार्थींनीना ‘गुड टच-बॅड टच’ ही संकल्पना त्यात घ्यायची खबरदारी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कला आधारित थेरपी आणि थिएटरच्या तत्त्वांचा वापर करून कार्यशाळा घेण्यात आली. त्यासाठी, ‘मीमांसा’च्या टीममधील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर्स आणि रेमेडियल एज्युकेटर्स सहभागी झाले होते. त्यांनी स्किट्स सादर करून विद्यार्थिनींना संकल्पना समजावून सांगितल्या. काही व्हिडिओही दाखवले.’मीमांसा’ ही स्वयंसेवी संस्था गेली नऊ वर्षे ठाणे महानगरपालिकेसोबत कार्यरत आहे. तसेच, ठाण्यातील अनेक शाळांसोबतही काम करते. ‘मीमांसा’चे विश्वस्त आणि अभिनेता, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनीही या कार्यशाळेत संवाद साधला. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाने कार्यशाळेची सांगता झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading