महापालिका आयुक्तांनी पिंजून काढली नौपाडा प्रभाग समिती – कोरोनामु्क्त रूग्णांशीही साधला संवाद

रोज एक एक प्रभाग समितीची पाहणी करून कोवीड 19 ची परिस्थिती समजून घेण्याबरोबरच इतर कामाचा आढावा घेण्याचा दिनक्रम सुरू केलेल्या महापालिका आयुक्तांनी आज जवळपास चार तास नौपाडा प्रभाग समिती पिंजून काढली. या पाहणी दौऱ्यात त्यांनी कोरोना मुक्त झालेल्या कोवीड योद्ध्यांशीही संवाद साधून त्यांची विचारपूस केली. आज सकाळी आयुक्तांनी महापौरांसमवेत कोपरी आनंदनगर परिसराची पाहणी केली. या भेटीत त्यांनी आनंदनगर येथे सुरू असलेले फिव्हर क्लिनिक, सार्वजनिक शौचालये, तसेच गल्ल्यांमध्ये जावून तेथील स्वच्छता, साफसफाई, नाले सफाई आदींची पाहणी केली. यानंतर त्यांनी चेंदणी कोळीवाडा प्रतिबंधिक क्षेत्राची पाहणी केली. चेंदणी कोळीवाडा परिसरात एकविरा देवी मंदीर, विठ्ठल मंदीर रोड, कोळीवाडा गाव, मीठबंदर रोड, चंद्रकांत नाखवा कोळी चाळ, युनायटेड स्पोर्टस, आनंदभारती, हरियाली तलाव, राऊत शाळा या परिसराची पाहणी केली. तसेच या परिसरातील कोरोनामुक्त रूग्णांच्या घरांना भेटी देवून त्यांच्याशी विचारपूस केली. त्यानंतर बी केबीन, रेल्वे लाईन येथील प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली. जांभळी नाका मुख्य धान्य बाजाराची फिरून पाहणी केली. हाजुरी, मनोरूग्णालय परिसराची पाहणी करून तेथील माहिती जाणून घेतली. चेंदणी कोळीवाडा येथे महापालिका आयुक्तांचा पाहणी दौरा सुरू असतानाच एका स्थानिक व्यक्तीने रस्त्यावर एक वृद्ध गृहस्थ पडला असल्याचे सांगताच महापालिका आयुक्तांनी तात्काळ धाव घेवून त्याला पाणी पाजण्यास सांगितले. तसेच त्याला रूग्णवाहिका बोलावून तातडीने निवारा केंद्रात नेण्याचे आदेश दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading