महापालिका आयुक्तांनी केला चिरागनगर, धर्मवीर आनंदनगरचा पाहणी दौरा

कोवीड १९ आणि पावसाळा या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आज चिरागनगर, धर्मवीर आनंदनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि सांस्कृतिक भवनला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. महापालिका आयुक्त गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक प्रभाग समितीची पाहणी करून त्या ठिकाणी कोवीडच्या अनुषंगाने काय उपाययोजना केल्या आहेत तसेच काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे याचा आढावा घेत आहेत. आज सकाळी चिरागनगर परिसराची आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी चिरागनगर आरोग्य केंद्राला भेट देवून तेथील डॉक्टरांशी संवाद साधला तसेच तेथील रूग्णांचीही चौकशी केली. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक- सांस्कृतिक भवन येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या संसर्ग चाचणी केंद्राची पाहणी केली. या ठिकाणी अँटीजन किटसच्या माध्यमातून कोवीड १९ ची चाचणी करण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद नगर येथे मिशन झिरो मोहिमेतंर्गत सुरू असलेल्या मोबाईल डिस्पेन्सरी सेंटरलाही आयुक्तांनी भेट दिली. तसेच डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सुरू असलेल्या चाचणी केंद्राला भेट दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading