परिस्थितीवर मत करत नेहा तावरेने बारावीत मिळवले घवघवीत यश

हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील एका मुलीने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. नामदेववाडी पाचपाखाडी भागात राहणा-या नेहा तावरेने घरची परिस्थिती प्रतिकूल असताना चांगले यश संपादन केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. दहा बाय दहाची खोली घरची परस्थिती बेताची असे असताना देखील परिस्थितीची तक्रार न करता मिळेल त्या गोष्टीचा आनंद घेत बी एन बांदोडकर कॉलेजच्या १२ वीच्या सायन्सला असणा-या नेहाने ७६ टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. नेहाचे वडील दुकानात नोकरी करतात तर आई एका नर्सरी शाळेत काम करते. आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे आणि तिचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी झटणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून परिस्थितीला सामोरे जात नेहाने जिद्दीने अभ्यास करून परिस्थितीवर मत करत १२वीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. नेहाला पुढे वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याची इच्छा आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading