स्वच्छता ही सेवा अभियान ठाणे जिल्हान्यायालय व जिल्हाविधी सेवा प्राधिकरणातर्फे उत्साहात संपन्न

Thane Police claim rise in conviction of cases; experts say ...

विधी व न्याय राज्यमंत्री, नवी दिल्ली तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.ईश्वर सूर्यवंशी व ठाणे महानगरपालिका उपायुक्त श्री.गोदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वामीनारायण संस्थेचे अध्यक्ष श्री.दोडीया व संस्थेतील स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील परिसरात “स्वच्छता ही सेवा- २०२३” हे अभियान उत्साहात संपन्न झाले.
“स्वच्छता ही सेवा-२०२३ अभियान राबविताना सर्वप्रथम सकाळी 0८.३० वाजता स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली व संपूर्ण न्यायालयीन परिसराची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानात मोटार अपघात दावा न्यायाधीकरण, ठाणे चे सदस्य एस.एन शाह, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), श्री.एस.के.फोकमारे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री.ए.एम.पाटणकर, 5 वे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री. जे.आर. मुलाणी, 6 वे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री. ए.सी डोईफोडे, 4 थे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री. ए.आर. शेंडगे, इतर न्यायिक अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी श्री.मारूती कावळे व स्वामीनारायण संस्थेचे अध्यक्ष व स्वयंसेवक यांनी तसेच सर्व स्तरातील न्यायालयीन कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेवून हे अभियान यशस्वी केले.
00000000

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading