मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं १५ फेब्रुवारीला चांदणं संमेलनाचं आयोजन

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं चांदणं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. पुढील शनिवारी म्हणजे १५ फेब्रुवारीला जिल्हा परिषद कार्यालयासमोरील मराठी ग्रंथसंग्रहालयात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महापौर नरेश म्हस्के, विवेक मेहेत्रे, धनश्री लेले, अरूण म्हात्रे असे मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. साहित्यिक गप्पा, मुलाखती, शब्दमोती, गझल, संगीत, कथा काव्य स्पर्धा, अनुभव कथन असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मर्यादित आणि सशुल्क प्रवेश आहे. अधिक माहितीसाठी २५४० ६७८७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading