ठाणे पूर्वतील स्कायवॉकवरून तरूणीनं उडी मारण्याची धक्कादायक घटना

ठाणे पूर्वतील टीएमटी बस स्थानकाजवळील स्कायवॉकवरून एका तरूणीनं उडी मारण्याची धक्कादायक घटना काल घडली आहे. विरार येथे राहणारी अंजली कश्यप ही तरूणी लोकमान्यनगर येथे राहणा-या मावशीकडे आली होती. आर जे ठाकूर महाविद्यालयात तिची एमएच सीआयटीची परीक्षा होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी जाते असं सांगून निघालेल्या अंजलीनं संध्याकाळच्या सुमारास कोपरीतील स्कायवॉकवरून स्वत:ला झोकून दिलं. अंजली पाठीवर पडल्यानं तिच्या मणक्याला जबर मार लागला आहे. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी तिला खाजगी रूग्णालयात दाखल करून पोलीसांना माहिती दिली. तिने नक्की उडी का मारली याचं कारण समजू शकलं नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading