मफतलाल कामगारांना थकीत देण्यांपैकी काही रक्कम येत्या सोमवारपासून मिळणार

गेली ३० वर्ष बंद असलेल्या मफतलाल कंपनीच्या कामगारांना यंदाचा दसरा पावला असून त्यांच्या कायदेशीर थकीत देण्यांपैकी काही रक्कम येत्या सोमवारपासून म्हणजे १४ ऑक्टोबरपासून त्यांना देण्यास सुरूवात होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं कामगारांना पैसे वाटप करण्याचे आदेश काल दिले आहेत. त्यामुळं या कामगारांची यंदाची दिवाळी काहीशी दिलासादायक जाणार आहे. ठाणे महापालिकेनं पूलाच्या बांधकामासाठी घेतलेल्या जमिनीचे ४० कोटी रूपये तर रेल्वेनं ३५ कोटींची रक्कम कोर्ट रिसीव्हरकडे भरली असून त्यातून कामगारांच्या वाट्याला आलेल्या रक्कमेतून ही देणी त्यांना देण्यात येणार आहेत. संजय केळकर यांनी मफतलाल कामगारांची थकबाकी मिळावी म्हणून सातत्यानं पाठपुरावा केला होता. तब्बल ३० वर्षानंतर कामगारांना त्यांची कायदेशीर थकीत देणी मिळण्यास यामुळं सुरूवात होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading