मनोरूग्ण व्यक्तीकडून बायकोसह मुलांना कोंडून मारहाण करण्याचा प्रयत्न

एका मनोरूग्ण व्यक्तीनं बायको मुलांना घरामध्ये कोंडून मारहाण करण्याचा प्रकार घडला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षानं धाव घेऊन घरातल्यांची सुटका केली. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पातलीपाडा येथील एका घरात अशोक लाटे या मनोरूग्ण व्यक्तीनं स्वत:ला घरात कोंडून घेतलं आणि पत्नी उज्ज्वला, मुलगी प्रेरणा आणि मुलगा साहिलला घराचा दरवाजा बंद करून मारहाण सुरू केली. ही बाब आजूबाजूच्या लोकांना कळल्यावर त्यांनी कासारवडवली पोलीसांना त्याची माहिती दिली. कासारवडवली पोलीसांनी या घराची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाची मदत मागितली. अग्निशमन दलाच्या लोकांनी येऊन डोअर ब्रेकरच्या सहाय्यानं घराचा दरवाजा तोडला आणि अशोक लाटे यांना पोलीसांच्या ताब्यात दिलं आणि घरातील इतर कुटुंबाला सुखरूप बाहेर काढलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading