ठाण्यामध्ये गारठा वाढला – पारा १८ अंशापर्यंत खाली

गेल्या काही दिवसापासून अपेक्षित असलेल्या थंडीला सुरूवात झाली असून आज तापमानाचा पारा १८ अंशापर्यंत घसरला होता. गेल्या दोन तीन दिवसापासून हवेतील गारव्यात चांगलीच वाढ झाली असून आज सकाळी हवेत धुकंही जाणवत होतं. सकाळी फिरायला जाणा-या मंडळींच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं दिसत होतं तर गेल्या काही महिन्यांपासून कपाटात बंद करून ठेवलेले स्वेटर, कानटोप्या आता दिसू लागले आहेत. काल रात्री काही ठिकाणी शेकोट्याही पेटवण्यात आल्या होत्या. हवेतील गारव्यात चांगलीच वाढ झाली असून अगदी दुपारनंतरही हवेतील हा गारवा जाणवणारा आहे. हवेतील या गारव्यामुळे प्रकृतीच्या तक्रारींमध्येही वाढ झाल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading