मदय विक्री करणारा हॉटेलमालक गजाआड

शासनाचे मनाई आदेश असताना हॉटेल्समध्ये बिअर आणि विदेशी मद्याची विक्री करणारा हॉटेल्स मालक गोपी नायडू याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्याकडून बेकायदेशीर विक्रीकरिता आणलेले वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 60 बॉक्स जप्त केले आहेत. त्यामध्ये बिअर,वाईन, विदेशी मद्य असा एकूण 2 लाख 7 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल आहे.
भाईंदर पूर्व येथे सहायक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार साळुंखे यांच्या पथकाने सापळा रचून नायडूला मदय विकताना पकडले. त्याच्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading