पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ब्रह्मांड शाखेवर खातेदारांनी मूक रूदन केले. खातेदारांना दिलासा द्यावा आणि बँकेला अ दर्जा देणा-या लेखा परिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी खातेदारांकडून देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. घोडबंदर परिसरात बँकेचे ३ ते साडेतीन हजाराहून अधिक खातेदार आहेत. मात्र बँकेवर निर्बंध आल्यामुळे हे खातेदार हवालदिल झाले आहे. या प्रार्श्वभूमीवर खातेदारांनी बँकेवर मूक मोर्चा काढला होता. या सर्वांनी मूक रूदन करत बँकेच्या व्यवस्थापिका महेक पंजवानी यांना निवेदन दिले. त्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेत खातेदारांनी आपल्या व्यथा मांडल्या.