मतदान यंत्रांच्या सरमिसळीकरणाची प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या सहाय्यानं पार

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या सहाय्यानं आज पार पडली. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रामधून प्रत्येक विधानसभा संघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येच्या ११० मतदान यंत्र, मतदान केंद्रांच्या १२७ टक्के व्हीव्हीपॅट याप्रमाणात मतदान यंत्राचे वितरण करण्यासाठी प्रथम सरमिसळीकरण यंत्रणा राबवण्यात आली. दुस-या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रिया विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांच्या स्तरावर होणार आहे. त्याद्वारे मतदान यंत्राचे मतदान केंद्र निहाय वितरण केलं जाईल असं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading