मतदान जनजागृतीसाठी उद्या रन फॉर व्होट मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

मतदान जनजागृतीसाठी उद्या रन फॉर व्होट मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मॅरेथॉनची सुरूवात होणार असून जिल्हाधिका-यांच्या हस्ते या मॅरेथॉनचा शुभारंभ होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये ३ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर असे ३ गट ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जांभळी नाका, गडकरी रंगायतन, राम मारूती रोड, नौपाडा, मल्हार टॉकीज, हरिनिवास सर्कल, प्रशांत कॉर्नर आणि पालिका मुख्यालयापासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात शेवट असा या मॅरेथॉनचा मार्ग आहे. विजया भट, श्रध्दा ननावरे, नंदा शेट्टी आणि प्रशांत सारंग यांच्यासह अनेक नामवंत धावपटू या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading