मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना कार्यक्रमाची मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी – जिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्हयातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदान केंद्रातील १ हजार ५०० मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे आणि पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. हे प्रस्ताव सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून भारत निवडणूक आयोग यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
तरी हा बदल आणि अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची प्रारूप यादी जाहीररित्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींकडून काही सूचना द्यावयाची असल्यास या कार्यालयास सूचना, आक्षेप किंवा हरकत असल्यास पुढील ७ दिवसांच्या आत त्या नोंदविण्यात याव्यात. असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४अंतर्गत मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम जिल्हयातील १८ विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वपुनरीक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून मतदारांची पडताळणी करण्यासाठी सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत गृहभेटीचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. तरी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading