कल्याणच्या दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 18 तासात वांद्रे येथून केली अटक

कल्याणच्या दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 18 तासात वांद्रे येथून अटक केली आहे हाझला खान आणि अनस शेख असे या आरोपीची नावे असून हत्येनंतर दोघेही फरार झाले होते. मात्र सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी या दोघांना शोधून काढले आहे. धक्कादायक म्हणजे तुझ्या ट्रकमुळे आमच्या गाडीचे नुकसान झाले आहे म्हणून आम्हाला पैसे दें असा बहाणा करुन दोघे ट्रक चालकाकडून जबरदस्तीने पैसे मागत होते. ट्रक चालक भोला याने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यांची हत्या केल्याची उघडकीस आले. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात एक ट्रक चालक भोला कुमार महंतो याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. गाडीच्या चालकाचा बोल्ट खाली पडल्याने त्याने कोन गाव ब्रीजवर गाडी उभी केली. गाडी चेक करीत असताना मागून एका दुचाकीने त्या ट्रकला धडक दिली आणि त्यानंतर दुचाकी वरती स्वार असलेल्या हाझला खान आणि अनस शेख या . दोघांनी तू ट्रक थांबविल्याने आमच्या गाडीचे नुकसान झाले आमच्या गाडीची नुकसान भरपाई दे असे सांगत भांडण सुरू केले. परंतू ट्रक चालक भोला कुमार यांही माझ्या गाडीमुळे नुकसान झालेले नाही. त्यामुळे मी काही पैसे देणार नाही असे सांगितल्याचा राग या दोघांना आल्याने या दोघांनी मिळून धारदार शस्त्राने भोलावर वार केले यात भोला याचा जागेवर मृत्यू झाला. कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपीना शोधण्यासाठी काही तपास पथके नेमली गेली. अखेर १८ तासांच्या आत दोन्ही आरोपींना वांद्रे येथून अटक करण्यात आली आहे. ट्रक चालकाची हत्या करुन दोघेही अजमेर जाण्याच्या तयारीत होते. त्याच दरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading