पालिकेची येऊर मधील बंगल्यां वर कारवाई

ठाणे महापालिकेनं सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांबरोबरच आता बड्या मंडळींच्या अनधिकृत बांधकामावरही कारवाई सुरू केली आहे. ठाण्यात येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत हे उद्यान येत असल्यामुळे या ठिकाणी अनेक निर्बंध आहेत. तरीही ठाण्यातील अनेक बड्या मंडळींचे या भागात बंगले आहेत. अशा अनधिकृत बंगल्यांबाबत महापालिकेनं कारवाईही करण्याचा प्रयत्न केला पण तरीही हे बंगले तसेच दिमाखात उभे आहेत. या बंगल्यांविरूध्द लोकायुक्तांकडे झालेल्या सुनावणीत लोकायुक्तांनी कडक आदेश दिले होते. त्यामुळे येऊर मधील ७ अनधिकृत बंगल्यांवर महापालिकेनं कारवाई केली आहे. येऊरमधील ७ बंगल्यांबाबत लोकायुक्तांनी अलिकडेच व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेतली. या सुनावणीत अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याबाबत झालेल्या विलंबाबाबत चौकशी करावी आणि विलंब झाले असल्याचे सिध्द झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी असे आदेश लोकआयुक्तांनी दिले आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading