मतदान करणा-या कर्मचा-याला डॉ. बेडेकर हॉस्पिटलतर्फे दिलं जाणार एक दिवसाचं अधिक वेतन

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्वच ठिकाणाहून प्रयत्न सुरू असताना मतदान करणा-या कर्मचा-यांना एक दिवसाचं वेतन अधिक देण्याचा निर्णय डॉ. बेडेकर हॉस्पिटलनं घेतला आहे. मतदान हा राष्ट्रीय उत्सव समजून जबाबदारीची जाणीव या नात्यातून या महोत्सवात हिरीरीनं सहभागी होण्यासाठी डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या सर्व कर्मचा-यांनी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. जे कर्मचारी मतदान करतील अशा कर्मचा-यांना मतदान केल्याची शाबासकी म्हणून एक दिवसाचं वेतन अधिक देण्याचा निर्णय घेतल्याचं डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading