मतदानातील मोठ्या प्रमाणावर नोटाच्या वापरामुळे काही ठिकाणी निकालावरही परिणाम

जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटा पर्यायाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला असून या नोटामुळे जिल्ह्यातील काही मतदारसंघांचा निकालही बदलला गेल्याचं दिसत आहे. काल झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यामध्ये एकूण ७५ हजार ४१७ मतदारांनी नोटा म्हणजे यापैकी कोणीही नाही या पर्यायाचा वापर केला. या नोटामुळे कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण मधील निकालामध्येही फरक पडला. जिल्ह्यात भिवंडी ग्रामीणमध्ये – ३ हजार ३४०, शहापूर – ४ हजार ३१३, भिवंडी पश्चिम – १ हजार ८८६, भिवंडी पूर्व – १ हजार ३५८, कल्याण पश्चिम – ३ हजार ५४२, मुरबाड – ६ हजार ७८३, अंबरनाथ – ४ हजार ३२२, उल्हासनगर – ४ हजार ९७८, कल्याण पूर्व – ३ हजार ६९०, डोंबिवली – ४ हजार १३४, कल्याण ग्रामीण – ६ हजार ९२, मीरा-भाईंदर – २ हजार ६२३, ओवळा-माजिवडा – ६ हजार ५४, कोपरी-पाचपाखाडी – ५ हजार १४७,
ठाणे – ५ हजार ५४७, मुंब्रा-कळवा – २ हजार ५९१, ऐरोली – ५ हजार २१३ तर बेलापूरमध्ये ३ हजार ८०४ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading