मखमली तलावाजवळील एका मद्याच्या दुकानातून पावणे सात लाखांची रोकड आणि मद्याच्या बाटल्या लांबवल्याची घटना घडली आहे. मखमली तलावाजवळील आकाश गृहनिर्माण सोसायटीतील एस लिकर्स या दुकानातून चोरट्यांनी शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील तब्बल पावणे सात लाखांची रोकड आणि मद्याच्या बाटल्या लंपास केल्या. सुनील खुबचंदानी या दुकान मालकांच्या चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.