कंटेनरच्या धडकेत दोन चारचाकी आणि दोन दुकानांचे नुकसान

घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जाणा-या कंटेनरने दिलेल्या धडकेत दोन चारचाकी आणि दोन दुकानांचे नुकसान झाले. मुंबईकडे जाणा-या कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं काल सकाळी हा अपघात झाला. या घटनेनंतर कंटेनरचा चालक पळून गेला. रिलायबल ट्रान्सपोर्ट सर्व्हीसेस कंपनीचा हा कंटेनर असून ओवळा नाका येथे हा अपघात झाला. यामध्ये न्यू गरीब नवाज कॅटरर्स आणि ड्रीम मेन्स सलून या दोन दुकानांचे नुकसान झाले. तर तिथे असलेल्या दोन कारनाही कंटेनरची धडक बसल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. कंटेनर पोलीसांनी ताब्यात घेतला असून चालक मात्र पळून गेला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading