भिवंडी इमारत दुर्घटना स्थळास वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी दिली भेट

भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग इमारत दुर्घटनास्थळी वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. दुर्घटनेस 60 तास झाले तरी बचावकार्य अद्याप सुरु आहे. एन डी आर एफ च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन बचावकार्याबाबत सुचना केल्या. यावेळी श्री शेख यांनी घटनेतील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्री आणि राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर इतर इमारतींच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आणि तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनास दिले. शहरातील अनधिकृत आणि अति धोकादायक इमारतींबाबत तसेच त्यासाठी प्रशासन पातळीवर सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर आढावा घेतला. या इमारतींच्याबाबत लवकरच शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अस्लम शेख यांनी यावेळी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading