ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ९३६ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ९३६ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात २९ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ हजार ३४५ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ४ हजार २३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ४१ हजार १६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख ६३ हजार ५९५ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ३ हजार ७०४ रूग्ण उपचार घेत असून २९ हजार ३४१ कोरोना रूग्ण बरे झाले तर ९४५ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ४ हजार ७७३ रूग्ण उपचार घेत असून ३४ हजार ३७३ बरे झाले तर ७८५ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ५८५ रूग्ण असून २९ हजार ८७२ बरे झाले तर ७१७ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ९४३ रूग्ण उपचार घेत असून १४ हजार ६२२ कोरोनातून बरे झाले तर ५२८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ६८१ रूग्ण असून ७ हजार ८६० बरे झाले तर २७९ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ३४० रूग्ण उपचार घेत असून ४ हजार १९२ कोरोनातून बरे झाले तर ३०२ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ४३३ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ५ हजार २८९ बरे झाले तर २२० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ५१८ रूग्ण असून ५ हजार १२६ कोरोनामुक्त झाले तर ७७ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये २ हजार ३६८ रूग्ण असून १० हजार ३४० बरे झाले तर ३८१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading