भिवंडीत पहाटे झालेल्या इमारत दुर्घटनेत एक मृत्यू तर एक जखमी

भिवंडी मध्ये आज पहाटेच्या सुमारास झालेल्या एका इमारत दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. भिवंडी मध्ये कान हॉटेल जवळ असलेल्या या तीन मजली इमारतीचा स्लॅब आणि सध्याचा काही भाग पहाटे साडेतीनच्या सुमारास कोसळला होता. या दुर्घटनेत मज्जित अन्सारी यांचा इमारतीचा काही भाग अंगावर पडल्यामुळे मृत्यू झाला. तर अघोरी यांची प्रयत्नानंतर सुटका करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाने धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं. या इमारतीचा काही भाग पडल्यामुळे तळमजल्यावर दुकानात राहत असलेल्या अन्सारी यांचा मृत्यू झाला तर नागोरी यांच्या अंगावर इमारतीचा राडाराडा पडल्यामुळे ते त्यात अडकले होते. बराच प्रयत्नानंतर त्यांचे मुक्तता करण्यात यश आल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading