लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग.

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग…. दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधून सहभागी झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे आपल्या शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. पंतप्रधानांच्या संवादानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शाळा क्रमांक २३ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थाना दिलेले हे संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. त्यांना अपेक्षित असलेला तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षा त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या विचार ऐकणारे विद्यार्थी त्यातून नक्कीच प्रेरणा घेतील आणि परिक्षेदरम्यान येणारा तणाव दूर सारून आपल्या क्षमता हेरून आपलं आयुष्य घडवतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असला पाहिजे. अपयशामुळे खचून जाऊ नका, यश हमखास मिळतेच असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आयुष्यात आलेल्या अपयशानंतर खचलो नाही, असे सांगितले. शाळा क्रमांक २३ विषयी आठवणी जाग्या करतानाच आपले वर्गशिक्षक रघुनाथ परब यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यावेळी शाळेची आतासारखी इमारत नव्हती तर चाळीत ही शाळा भरायची. शाळेची स्वच्छता स्वत:च करायचो. त्यात वेगळा आनंद होता, असे सांगत मुख्यमंत्री आठवणीत रमले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील संगणक लॅब, वर्ग खोल्या, तसेच पिण्याच्या पाण्याच्या जागेची पाहणी केली. बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी मुलांशी संवाद साधला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading