भिवंडीतील एका गोदामात झालेल्या स्फोटामध्ये दोन व्यक्ती जागीच ठार

भिवंडीतील खांबे गावातील एका गोदामात ऍसिडच्या ड्रम चा स्पोर्ट होऊन दोन व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. त्या ठिकाणी डायथेलिन ग्लायक्लोन हे ऍसिड असलेल्या ड्रम मधील ऍसिडच्या सॅम्पल ची तपासणी होत होती, त्यावेळीच एक कर्मचारी धूम्रपान करत होता त्यातून हा स्फोट झाल्याचं सांगितलं जातं या गोदामात 230 लिटरचे प्रत्येकी चार ड्रम होते. आग लागल्यामुळे मोठा स्फोट झाला. ही माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रमजान शेख आणि मोहम्मद शेख अशा दोन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading