श्री नित्यानंद महाराज यांच्या समाधी मंदिरात कोकण, परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांनी श्री नित्यानंद स्वामींचे दर्शन घेतले. ह्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांनी गणेशपुरी पोलीस स्टेशनला कार्यालयीन कामकाज भेट देण्यास आले होते. त्यावेळी पवार यांनी मंदिरात दर्शनाला येऊन, कापूर आरती करून बाबांचे आशिर्वाद घेतले. त्यावेळी त्यांच्या समवेत ठाणे जिल्हा अधीक्षक विक्रम देशमाने आणि इतर अनेक पोलिस अधिकारी यांनी दर्शनाचा लाभ घेतला.