ठाण्यातील नौपाडा भागात असलेल्या एका इमारतीतील पीव्हीसी पाईप चा साठा असलेल्या खोलीमध्ये आग

ठाण्यातील नौपाडा भागात असलेल्या एका इमारतीतील पीव्हीसी पाईप चा साठा असलेल्या खोलीमध्ये आग लागली होती. रात्रीच्या सुमारास आग लागल्यामुळे कोणतेही जीवित हानी झाली नाही. नौपाड्यातील रिलायन्स मार्ट जवळ मानस या इमारतीचा बांधकाम सुरू आहे. पण अधिक 18 मजली असलेल्या या इमारतीच्या सातव्या मजल्यावर असलेल्या एका खोलीत पीव्हीसी पाईपचा साठा होता. या खोलीत रात्री नऊच्या सुमारास लागली होती. या आगीची माहिती मिळताच नौपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाने धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणली. रात्री साडे अकराच्या सुमारास ही आग पूर्णपणे नियंत्रणात आली. या आगी मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading