भाषा समृध्द होण्यासाठी वाचन आवश्यक – नरेश म्हस्के

भाषेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणे जरी अवघड असले तरी समाजात वावरताना भाषा ही तितकीच महत्वाची आहे. भाषा समृध्द होण्यासाठी वाचन करणे आवश्यक असल्याचे सभागृह नेते नरेश
म्हस्के यांनी सांगीतले. ठाणे महापालिका नागरी कामांबरोबरच शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांचे कौतुक देखील करते. शालांत परीक्षेत विविध भाषांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त
केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आला.यावेळी शालांत परीक्षेत सर्वांधिक गुण प्राप्त केलेल्या ठाणे महापालिका हद्दीतील सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
महापौर मिनाक्षी शिंदे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. रोजच्या जीवनात आपण प्रत्येकजण आपापल्या मातृभाषेचा वापर करीत असतो. परंतु मराठी भाषा ही बोलण्यास सोपी
असली तरी प्रत्यक्षात परीक्षेत गुण प्राप्त करताना भाषेत सर्वांधिक गुण मिळविणे ही अवघड बाब आहे. ऱहस्व, दीर्घ वेलांटी, काना, मात्रा या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. भाषेत सर्वाधिक गुण प्राप्त
करण्यासाठी नियमित वाचन आणि सराव आवश्यक असल्याचे मत उपायुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केले. यावेळी मराठी, हिंदी, उर्दु, गुजराथी, कन्नड, संस्कृत या विषयांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त
केलेल्या ठाणे महापालिका हद्दीतील शाळांमधील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी ठाणे महापालिकेच्या महिला कबड्ढी संघातील शिवछत्रपती पुरस्कार विजेती कोमल देवकर,
ललिता घरड, तेजस्वी पटेकर, श्रध्दा पवार, सायली नागवेकर यांचाही सत्कार यावेळी महापौरांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading