मँरेथाँन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसांनी सहकार्य करण्याची महापौरांची सूचना

रविवार 18 ऑगस्ट रोजी होत असलेल्या ठाणे महापौर वर्षा मँरेथाँनमध्ये सहभागी होणाऱया स्पर्धकांना स्पर्धेदरम्यानकोणत्याही प्रकारचा वाहतूकीचा अडथळा होवू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना
करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे मँरेथाँन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसांनी सहकार्य करावे अशा सूचना महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिल्या.ठाणे महानगरपालिका आणि ठाणे
जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून रविवार 18 ऑगस्ट रोजी ’ठाणे महापौर वर्षामँरेथाँनचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयाजवळून सकाळी 6.30 वा. या स्पर्धेस
प्रारंभ होणार आहे. मुख्यालया पासून ही स्पर्धा तीन हात नाका मार्गे, वागळेइस्टेट, वर्तकनगर येथून घोडबंदर मार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय येथे समाप्त होणार आहे. स्पर्धेच्या मार्गावर आवश्यक
त्या ठिकाणीबॉरिगेटस् लावणे, स्पर्धा मार्गावर सेवा रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग करण्यात आलेल्या गाडय़ांवर कारवाई करणे, पोलीस विभागाने देखीलबंदोबस्तासाठी आवश्यक पोलीस कर्मचारी
पुरविणे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading