भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला म्हणून अजित पवार यांना ठाण्यात जोडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या तीव्र प्रतिक्रिया ठाण्यात उमटल्या. राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. अजित पवार यांच्या प्रतिमेला जोड्याने मारले आणि त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचाही प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवार यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण होतं. या आंदोलनातून कार्यकर्त्यांच्या मनातील भावनाच व्यक्त झाल्या. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading