चितळसर पोलीसांनी अवघ्या ३ दिवसात उघडकीस आणली ३९ लाखांची चोरी

मालक बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून नोकराने केलेली चोरी ३ दिवसात उघड करून आरोपीसह सर्व माल जप्त करत चितळसर पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हिरानंदानी मिडोज येथील राधारमण त्रिपाठी यांच्या घरी गेल्या ४ वर्षापासून काम करणारा नोकर हिरालाल गोराईन याने ३९ लाखांचे दागिने आणि सोन्याची चोरी केली. १५ नोव्हेंबरला त्रिपाठी यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी चितळसर पोलीसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला. चितळसर पोलीसांनी झारखंड मधील बोकारो जिल्ह्यातील बनसिमली गावात जाऊन स्थानिक पोलीसांच्या मदतीनं आरोपीचं गावातील घर शोधून काढलं. संपूर्ण घर आणि परिसर तपासला तरीही आरोपी बोलायला तयार नव्हता. त्यातच झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका असल्यानं वातावरण संवेदनशील होते. अशा परिस्थितीत गावक-यांना विश्वासात घेऊन आरोपी आणि त्याच्याकडील चोरीतील सर्व ऐवज शिताफीनं परत मिळवला. परराज्यात जाऊन चितळसर पोलीसांनी आरोपीला झारखंड मधून पकडून त्याच्याकडील सर्व ऐवजही परत मिळवण्याची कामगिरी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading