सध्या भाज्यांचे दर गगनाला भिडले असून रोज दरामध्ये वाढ होत आहे. कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, टोमॅटो, शेवगा, गवार, मेथी, कोंथिबीर या भाज्यांचे दर वाढले आहेत. अवकाळी पाऊस, तीव्र ऊन्हाळा, पाण्याची कमतरता यामुळे भाज्यांची आवक ही कमी झाली आहे. कोबीच्या दरात 8 रुपयांनी वाढ झाली असून फ्लॉवर 20 ते 22 रुपयांनी वाढला आहे. आज भाज्यांच्या दरात 30 ते 40% इतकी वाढ झाली असून 500 गाड्यांची आवक झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे नागरिकांना भाजीपाल्यांचे दर न परवडणारे आहेत.