भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त जनसंघापासून कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

भाजपाचा ४३ वा स्थापनादिन ठाणे शहरात आज उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाच्या खोपट कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर, जनसंघापासून भाजपाचे अथकपणे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थापना दिनानिमित्ताने भाजपाच्या वतीने ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात मुख्य कार्यक्रम झाला. कार्यालयाबाहेर ध्वजारोहण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जनसंघापासून भाजपामध्ये कार्यरत असलेले अनिल भदे, मुकुंद टांकसाळे, भरत अनिखिंडी, आनंद सहस्रबुद्धे, विलास दळवी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचे पक्षातील योगदानाबद्दल आभार मानण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading