स्लॅब पडल्यामुळे घरात अडकलेल्या शंभर वर्षीय महिलेची सुखरूप सुटका

मुंब्यातील राणा निवास या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब आज दुपारच्या सुमारास पडला. सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. राणा निवास ही इमारत तळ अधिक एक मजला असून ती २० ते २५ वर्ष जुनी आहे. या इमारतीमध्ये ८ कुटुंबं राहत आहेत. या इमारतीच्या चाळीच्या गॅलरीचा स्लॅब आज दुपारच्या सुमारास पडला. यावेळी पहिल्या मजल्यावर राहणा-या १०० वर्षीय वृध्द महिला लक्ष्मी मंचेकर या घरामध्ये अडकल्या होत्या. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसंच टोरंट कंपनीच्या कर्मचा-यांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य केलं आणि या वृध्द महिलेची घरातून सुखरूप सुटका केली. या इमारतीमध्ये निर्मला आढाव, इरफान भाई, देवा जगताप, चंद्रकिरण जगताप, संगीता बागडे, शिवाजी मंचेकर, ललिता जगताप, सुरेश खरात अशी ८ कुटुंबं राहत आहेत. चाळीचा उर्वरीत भागही धोकादायक असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी लावण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading